रवींद्र कीर्तीशाही यांना संघर्ष शेतकरी संघटनेत महत्वाची जबाबदारी

रवींद्र कीर्तीशाही यांना संघर्ष शेतकरी संघटनेत महत्वाची जबाबदारी

छत्रपती संभाजीनगर: संघर्ष शेतकरी संघटनेची महत्वपूर्ण पदाधिकारी बैठक पिसादेवी येथील संघटनेच्या कार्यालयात संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत रवींद्रकुमार अर्जुनराव कीर्तीशाही यांची छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य अधिकारी विभागाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करीत नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. 

          यावेळी मराठवाडा अध्यक्षपदी बाळासाहेब भूमे, उपाध्यक्षपदी सतीश बोरसे, संघटकपदी विजयजी घुले, जिल्हाध्यक्षपदी उदयराज गायकवाड, जिल्हा उपाध्यक्षपदी दीपक नारळे, जिल्हा सचिवपदी योगेश जाधव, शहर जिल्हाध्यक्षपदी विक्रम जिवरग पाटील, फुलंब्री तालुकाध्यक्षपदी साहेबराव शिंदे, छत्रपती संभाजीनगर तालुकाध्यक्षपदी राहुल मते, खुलताबाद तालुकाध्यक्षपदी गोरख राऊत, शहर उपाध्यक्षपदी मयुर गायकवाड, शहर कार्याध्यक्षपदी रोहिदास फुलमाळी आणि फुलंब्री तालुका उपाध्यक्षपदी गजानन जाधव यांची निवड करण्यात आली.

       रवींद्रकुमार कीर्तीशाही यांना छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य अधिकारी विभागाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले आहे. ही जबाबदारी त्यांना संघटनेच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी आणि समाजहितासाठी योगदान देण्यासाठी देण्यात आली आहे.

           यावेळी कर्जमाफी, पीकविमा आणि रोजगार हमी योजनेतील थांबलेल्या अनुदानासह विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.  

         बैठकीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मुंबई मोर्च्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी खंबीर साथ द्यावी आणि आरक्षणाची लढाई निस्वार्थपणे लढणाऱ्या नेतृत्वाचे हात बळकट करावेत, असे आवाहन करण्यात आले. "जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मागे फिरायचे नाही," असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.  

        बैठकीत "जय जवान, जय किसान, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र" असा संदेश देत शेतकरी आणि समाजाच्या हितासाठी लढण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.