फसवी लिंक : टाटा ग्रुपला 150 वर्षे झाली, लिंकवर क्लिक करून मोफत कार जिंका

फसवी लिंक :  टाटा ग्रुपला 150 वर्षे झाली, लिंकवर क्लिक करून मोफत कार जिंका

टाटा ग्रुप यांना 150 वर्षे पूर्ण झाली असल्याने "click on the link to participate in the event to win a car" अशा प्रकारचा संदेश सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अशा प्रकारची कोणतीही लिन्क प्राप्त झाल्यास संदेशात दिलेल्या लिंक वर क्लिक करू नये. टाटा ग्रुप यांचे मार्फत "टाटा ग्रुप यांना 150 वर्षे पूर्ण झाली असल्याने मोफत कार जिंकण्याची संधी" अशा प्रकारची कोणतीही योजना टाटा ग्रुप यांनी जाहीर केलेली नाही.

टाटा ग्रुप ने अशी कोणतीही योजना आणलेली नसून अशा अशा कोणत्याही लींक वर क्लिक करू नये असे आवाहन टाटा ग्रुप कडून ट्विटर चे माध्यमाने करण्यात आले आहे.

https://twitter.com/TataCompanies/status/1443813902131728384?s=19

नागरिकांना आव्हान करण्यात येते की ऑनलाईन खरेदी करताना योग्य ती खबरदारी घ्यावी मोफत कार जिंकण्याच्या आमिषाला बळी पडून अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या लिंक वर क्लिक करू नये व त्यामध्ये आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये.